Sakshi Sunil Jadhav
अनेकांना नाश्त्याला काही चटपटीत आणि गरमागरम खावंस वाटतं. पण बाहेरचे आणि खराब तेलात तळलेले पदार्थ तुमचं नुकसान करतील.
काही लोक नेहमीच नुसता वरण भात खाऊन कंटाळतात. त्यामुळे काहींना रोज जेवण फेकून द्यावं लागतं.
पुढे आपण एक भन्नाट रेसिपी जाणून घेणार आहोत. जी नाश्त्यासोबत किंवा वरणभातासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता.
उरलेला भात २ कप, १ कांदा, ३ हिरव्या मिरच्या, १ गाजर, शिमला मिर्ची १, कोथिंबीर, मीठ, धणे पावडर, गरम मसाला, तेल इ.
सर्वप्रथम उरलेला भात एका भांड्यात काढून घ्या. घरात उरलेला भात फेकून न देता त्याचे आपण कुरकुरीत पकोडे तयार करणार आहोत.
या रेसिपीसाठी उरलेला भात आणि उकडलेले बटाटे एकत्र मॅश करून त्यात कांदा, गाजर आणि शिमला मिरची बारीक चिरून घाला.
आता संपूर्ण मिश्रणात चवीनुसार मीठ, धणे पूड, गरम मसाला आणि लाल तिखट घालून थोडं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करा.
तयार मिश्रणाचे छोटे गोळे करून ते गरम तेलात सोनेरी रंग येईपर्यंत तळा. त्याने पकोडे खूपच कुरकुरीत होतात.
उरलेल्या भाताचा योग्य वापर होतोच, शिवाय कमी वेळात तयार होणारी ही रेसिपी संध्याकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम पर्याय ठरु शकते.