Monsoon Travel: या वर्षी पावसाळ्यात नक्की भेट द्या! भारतातील सुंदरतेने नटलेली 'ही' शांत ठिकाणं

Dhanshri Shintre

पर्यटनस्थळे

पावसाळा सुरू होताच भारतातील अनेक पर्यटनस्थळे हिरवळीने बहरतात आणि अधिकच आकर्षक वाटू लागतात.

प्रवासाचे नियोजन

मित्रांसोबत प्रवासाचे नियोजन केल्यास खर्च वाटतो आणि सहल अधिक मजेदार व परवडणारी होते.

पचमढी

पावसाळ्यात पचमढीचे सौंदर्य अधिक खुलते. अप्सरा विहार, बी धबधबा, जटाशंकर गुहा व पांडव गुहा ही ठिकाणे खास आकर्षण ठरतात.

महाबळेश्वर

पावसाळ्यात महाबळेश्वरचे निसर्गसौंदर्य अजूनच खुलते. महाबळेश्वर मंदिर, आर्थर सीट, लिंगमाला धबधबा, एलिफंट हेड पॉइंट आणि वेण्णा तलाव पाहण्यासारखी ठिकाणं आहेत.

लोणावळा

पावसाळ्यात लोणावळ्याचे सौंदर्य अधिक खुलते. येथे लोहागड, पवना तलाव, तिकोना, तुंग, राजमाची आणि कोरीगड किल्ल्यांचे निसर्गरम्य सौंदर्य अनुभवता येते.

कुर्ग

पावसाळ्यात कुर्गचे सौंदर्य अधिक खुलते. येथे अब्बी फॉल्स, तलकावेरी, मंडलपट्टी, होन्नमना केरे आणि ब्रमगिरी टेकड्यांसारखी आकर्षक ठिकाणे भेटीसाठी आहेत.

मुन्नार

केरळमधील मुन्नार हे पावसाळ्यात अधिकच मोहक भासते. येथे एरविकुलम उद्यान, मट्टूपेट्टी धरण, चिन्नार अभयारण्य व अनामुडी शिखरासारखी ठिकाणे पाहायला मिळतात.

माउंट अबू

पावसाळ्यात माउंट अबूचे सौंदर्य खुलते. येथे नक्की तलाव, गुरुशिखर, अचलगड किल्ला आणि वन्यजीव अभयारण्यासारखी आकर्षक ठिकाणे जरूर पाहा.

NEXT: रायगड अन् शिवराज्याभिषेक सोहळा! किल्ल्याजवळील लपलेली ठिकाणे तुम्हाला माहित आहे का? वाचा

येथे क्लिक करा