ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कारलं हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्याचे काम करते. कारल्याची भाजी आवडतं नसेल तर कारल्याचं चटपटीत मसालेदार लोणचं नक्की ट्राय करा.
कारले, मोहरी, जीरे, ओवा, मेथी दाणे, हिंग, हळद, बडीशेप, लाल मिरची पावडर, गरम मसाला, आमचूर पावडर, लिंबू, तेल आणि मीठ
२० मिनिटानंतर मीठ लावलेले कारल्याचे पाणी काढून पुन्हा धुवून घ्या. आणि पेपर टॉवेलवर ठेवून २० ते मिनिटासाठी कारल्याला कोरडे होऊ द्या.
एका पॅनवर हे सर्व मसाले भाजून घ्या आणि पावडर बनवून घ्या.
एका कढईत तेल गरम करुन घ्या. यात मोहरी, हिंग, हळद आणि मीठ घालून मसाला शिजवून घ्या. हा मसाला कारल्यामध्ये टाकून कारलं आणि मसाले व्यवस्थित मिक्स करुन घ्या.
हेल्दी, मसालेदार आणि चटपटीत कारल्याचं लोणचं तयार आहे. गरमागरम डाळभात किंवा चपातीसोबत याचा आस्वाद घ्या.