Shreya Maskar
मकर संक्रांतीला चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो हवा असेल तर कॉफी फेस स्क्रब घरी तयार करा. यामुळे टॅनिंग दूर होईल आणि थंडीत मुलायम त्वचा मिळेल.
कॉफी फेस स्क्रब बनवण्यासाठी कॉफी पावडर, साखर, नारळ तेल, मध, फेस वॉश आणि दालचिनी इत्यादी साहित्य लागते. एका बाऊलमध्ये हे सर्व पदार्थ मिक्स करून फक्त ५ मिनिटांत फेस स्क्रब तयार झाला.
फेस स्क्रब लावण्यसाठी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. हिवाळ्यात तुम्ही कोमट पाण्याचा वापर करू शकता. त्यानंतर कॉफी फेस स्क्रब घेऊन हातावर घेऊन चेहऱ्याला चांगले लावा.
कॉफी फेस स्क्रबचा वापर तुम्ही हाताचे कोपर, गुडघे आणि घोट्यांवर करू शकता. यामुळे काळवंडलेली त्वचा ग्लो करू लागेल. मात्र जास्त जोरात चेहऱ्यावर स्क्रब करू नका. नाहीतर त्रास होईल.
डेड स्किन आणि टॅनिंग काढून टाकण्यासाठी स्क्रबने चेहऱ्याला 5-7 मिनिटे मालिश करा. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.
स्क्रबिंग केल्यानंतर त्वचा खूप संवेदनशील होते. म्हणून ती मऊ टॉवेलने पुसून कोरडी करा आणि त्यावर चांगले मॉइश्चरायझर किंवा नारळाचे तेल लावा.
आठवड्यातून 1-2 वेळा हे फेस स्क्रब वापरू शकता. नियमित वापरामुळे कोरडेपणा कमी होईल, टॅनिंग कमी होईल आणि तुम्हाला नैसर्गिक चमक मिळेल.
कॉफी- साखर त्वचा नैसर्गिकरित्या त्वचेला एक्सफोलिएट करते. मध आणि नारळाचे तेल त्वचेला आतून पोषण देते. दालचिनी रक्ताभिसरण वाढवते, ज्यामुळे त्वचा चमकते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.