Manasvi Choudhary
नवीन वर्षातला पहिला सण म्हणजे मकरसंक्रांती.
संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या नावाने साजरा होणाऱ्या या सणाला महाराष्ट्रातही विशेष महत्व आहे.
मकरसंक्रांतीमध्ये तीळ आणि गुळाला महत्व आहे.
या दिवशी विवाहित महिला सुगड पूजन करतात.
सुगडाची पूजा पाटावर किंवा चौरंग मांडून त्यावर केली जाते.
पाटाभोवती छान रांगोळी काढून त्यावर लाल रंगाचे वस्त्र ठेवून तांदूळ किवा गहू ठेवावे.
सुगड म्हणजेच काळे किंवा लाल रंगाचे छोटे घट. या घटात शेतात बहरलेलं नवं धान्य ठेवून त्याची पूजा केली जाते.
धनधन्याचं प्रतिक म्हणून त्यात हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरं, तिळगुळ हे साहित्य सूगडमध्ये भरलं जाते.
सुगड पाटावर मांडण्याआधी त्याला हळद-कुंकूच्या उभ्या रेषा लावून सजवावे,
या दिवशी तिळाचे लाडू आणि हलव्याचा नैवेद्य दाखवावा.