Siddhi Hande
मुंबईतील वरळी येथे महिंद्रा टॉवर्समध्ये द म्युझिम ऑफ लिव्हिंग हिस्ट्री उभारण्यात आले आहे. यामध्ये अनेक गोष्टी ठेवण्यात आल्या आहेत.
महिंद्रा ग्रुपने २०२२ मध्ये हे संग्रहालय सुरु केले होते. यामध्ये अनेक भूतकालीन वस्तू ठेवण्यात आल्या आहे.
हे संग्रहालय फक्त पाहण्यापुरते मर्यादित नसून तेथील अनुभव खूप काही शिकवून जातो.
महिंद्रा समूहाच्या ८१ वर्षीय जुन्या परंपराचा हा ठेवा आहे, असं म्हणायला हरकत नाही.
महिंद्रा समूहाच्या या म्यूझियममध्ये कलात्मक सादरीकरण, व्हिडिओ प्रेझेंटेशन आणि वैयक्तिक कथने सादर केली जातात.
संग्रहालयात अनेक व्यवसायांची माहिती, प्रवासाची माहिती दिली आहे. कलाकृतीच्या स्वरुपात महिंद्राचा प्रवास दाखवला आहे.
या कल्पकतेतून साकारलेल्या जगात एक वेगळाच अनुभव आहे. कंपनीचे मूल्य, नैतिकता आणि सामाजिक बांधिकली दर्शवण्यात आली आहे.
कारचे, ट्रॅक्टरचे मॉडेल कसे तयार केले जातात, याची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.