Dhanshri Shintre
महिंद्राने be 6 ची खास बॅटमॅन एडिशन कार सादर केली आहे. मर्यादित आवृत्तीत केवळ 999 युनिट्स तयार करण्यात आले असून ती कलेक्टर्ससाठी आकर्षण ठरणार आहे.
शनिवारपासून महिंद्राच्या बीई 6 बॅटमॅन एडिशनसाठी बुकिंग सुरू झाली असून, पहिल्याच दिवशी ग्राहकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत गाडीप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
महिंद्राची बीई 6 बॅटमॅन एडिशनची किंमत 27.79 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ही खास आवृत्ती इलेक्ट्रिक एसयुव्हीच्या टॉप मॉडेल पॅक थ्रीवर आधारित आहे.
या गाडीत एलईडी हेडलाईट्स, सी-आकाराचे डीआरएल, एलईडी फॉग लॅम्प्स आणि सी-शेप टेललाइट्स देण्यात आले असून ती अधिक प्रीमियम आणि आकर्षक लुक देते.
केबिनचे डिझाइन पूर्ववत ठेवले असून, ऑल-ब्लॅक थीममध्ये तयार केले आहे. ड्रायव्हर एरियाभोवती हेलो-शेप घटकांना यलो फिनिश देऊन स्पोर्टी लुक साधण्यात आला आहे.
या गाडीत पॅनोरमिक ग्लास रूफसोबत खास लायटिंग एलिमेंट्स दिले आहेत, ज्यामुळे रात्रीच्या वेळी तिचा लुक अधिक स्टायलिश आणि आकर्षक दिसतो.
या कारमध्ये दोन 12.3-इंच स्क्रीन, 16 स्पीकर हरमन कार्डन साउंड सिस्टम आणि ऑगमेंटेड रियलिटीवर आधारित हेड्स-अप डिस्प्लेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.