Shraddha Thik
देशात सध्या इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ पाहायला मिळत आहे.
इलेक्ट्रिक वाहने वापरल्याने पर्यावरणाला धोका निर्माण होत नाही. त्यामुळेच बाजारात इलेक्ट्रिक बाइकची मागणी वाढत आहे.
देशात इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यात महाराष्ट्राचा दुसरा नंबर आहे.
उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक इलेक्ट्रिक वाहने वापरली जात आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये 7 लाख लोकांनी इलेक्ट्रिक वाहनांचे रजिस्ट्रेशन केले आहे. तर महाराष्ट्रात 4 लाख लोकांनी इलेक्ट्रिक वाहने खरेदी केल्या आहेत.
कर्नाटकात 3.1 लाख लोकांनी इलेक्ट्रिक कार खरेदी केल्या आहेत तर दिल्लीत 2.6 लाख लोकांनी इलेक्ट्रिक कार खरेदी केल्या आहेत.
कमी खर्चीक आणि इंधनाची बचत करणाऱ्या इलेक्ट्रिक कारला ग्राहकांनी पसंती दर्शवली आहे.