Siddhi Hande
घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. गणेशोत्सवात अनेकांच्या घरात फराळ बनवला जातो.
गणेशोत्सवात घराघरात करंजी बनवली जाते. करंजी बनवण्याची सोपी पद्धत जाणून घ्या.
सर्वात आधी तुम्हाला एका परातीत मैदा, रवा आणि थोडं मीठ टाकायचं आहे. त्यात गरम तेल टाका.
यानंतर या मिश्रणात थोडे पाणी टाकून पीठ मळून घ्या. या पीठावर रुमाल टाकून १५-२० मिनिटे बाजूला ठेवा.
यानंतर सारण बनवण्यासाठी एका पॅनमध्ये खोबरे घ्या. त्यात रवा टाकून भाजून घ्या. यानंतर मिश्रण थंड झाल्यावर त्यात पिठी साखर आणि वेलची पूड टाका.
यानंतर तुम्ही पीठाचे गोळे बनवून घ्या. हे पुरीप्रमाणे लाटा.
यानंतर या पुरीत सारण भरुन करंजी बनवण्याच्या साच्यात टाकून करंजी कापून घ्या.
यानंतर तेल गरम करा. मंद आचेवर करंजी सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.