ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्राजक्ता माळी अभिनेत्री, निवेदिका आहेच शिवाय ती आता यशस्वी बिझनेस वूमन आहे
प्राजक्ताने 'प्राजक्तराज'च्या माध्यमातून दागिने आणि ज्वेलरी व्यवसायात पदार्पण केलं.
या प्राजक्तराजच्या माध्यमातून आता प्राजक्ता वेगवेगळ्या पारंपरिक दागिन्यांचा साज घेऊन चाहत्यांच्या भेटीस येत आहे.
नुकतेच प्राजक्ताने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत
प्राजक्तराज कलेक्शन मधले दागिने परिधान केल्याने प्राजक्ता आकर्षक दिसते आहे
स्लिवलेज ब्लाऊज सह सिल्वर दागिन्यांनी प्राजक्ताच्या मॉडर्न लूकला खुलवलं आहे.
प्राजक्तराजच्या दागिन्याविषयी माहिती देत हे फोटो प्राजक्ताने पोस्ट केले आहेत.
काही मिनिटांतच प्राजक्ताच्या या फोटोंवर हजारोंमध्ये लाईक्स आले आहेत.