ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मराठी इंडस्ट्रीत दमदार व्यक्तिमत्व आणि लोकप्रिय कलाकार अशी प्राजक्ता माळीची ओळख आहे.
प्राजक्ताला आपण अनेक मालिका, सिनेमा, वेबसिरीजमधुन पाहिलंय
प्राजक्ताच्या मराठमोळ्या सौंदर्याचा राज काय आहे ते जाणून घेऊया
काहीदिवसांपूर्वीच प्राजक्ताने 'प्राजक्तराज'च्या माध्यमातून दागिने आणि ज्वेलरी व्यवसायात पदार्पण केलं.
प्राजक्तराजचे प्रमोशन करताना प्राजक्ता मराठमोळ्या लूकने साऱ्यांनाच घायाळ करते
नुकतचं प्राजक्ताने सोनसळा हा दागिना लॉन्च केला आहे
मोरठुशी, सोनेरीमणीनथ आणि कुडी प्राजक्तराज या प्राजक्ताच्या कलेक्शनमध्ये उपलब्ध आहे.
चांदीच्या दागिन्यांमध्ये म्हाळसा चांदी बेलपानटिक, जोंधळेमणीगुंड, कोयरीतोडे, कुडी बाजूबंद , गुलाबकाटा प्राजक्तराजमध्ये आहेत.
मोहनमाळ प्राजक्तराजच्या दागिन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल