Nauvari Saree: लाखात भारी नऊवारी, फक्त साडी नाही तर संस्कृती

Satish Kengar

नऊवारी साडी

काष्टा साडी किंवा नऊवारी साडी ही साडी नेसण्याची एक शैली आहे.

Nauvari Saree | Instagram

धोतर

महाराष्ट्रीय धोतर ज्या प्रकारे परिधान केली जाते त्याचप्रकारची ही शैली आहे.

Nauvari Saree | Instagram

नऊ गजांचे एकच कापड

काष्ट या शब्दाचा अर्थ साडीला पाठीमागे बांधणे असा होतो. ही साडी सामान्यतः नऊ गजांचे एकच कापड वापरून नेसली जात असल्याने तिला नऊवारी असे देखील म्हटले जाते.

Nauvari Saree | Instagram

पोशाख

यालाअखंड वस्त्र असेही म्हटले जाते. याचा अर्थ त्याला आधार देण्यासाठी इतर कोणत्याही पोशाखाची आवश्यकता नसते.

Nauvari Saree | Instagram

महिला

हा पोशाख अत्यंत महत्त्वाचा मानला जातो कारण विविध क्षेत्रातील महिलांनी तो परिधान केला आहे.

Nauvari Saree | Instagram

सांस्कृतिक पोशाख

हा पोशाख केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये परिधान केला जात नाही, तर महिलांनी इतिहासात या पोशाख युद्धे देखील लढली आहेत.

Nauvari Saree | Instagram

शेत

अजूनही नऊवारी परिधान करून अनेक महिला शेतात काम करतात.

Nauvari Saree | Instagram

ही साडी या राज्यात नेसली जाते

ही साडी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवासारख्या राज्यात मुख्यत्वे आढळून येते.

Nauvari Saree | Instagram

Next: बीडमधील ऐतिहासिक अन् निसर्गरम्य ठिकाणे

Beed Tourist Places | Google.com
येथे क्लिक करा