Bharat Jadhav
जर तुम्ही लोणावळा आणि महाबळेश्वरच्या गर्दीपासून दूर, मुंबईजवळ शांत, निसर्ग ठिकाणी जाणार असाल तर इगतपुरी हा एक उत्तम पर्याय ठरेल.
इगतपुरी मुंबईपासून सुमारे १४० किलोमीटर अंतरावर आहे. हे सुंदर हिल स्टेशन थंड हवामान, ढगांनी झाकलेले टेकड्या, धबधबे आणि नैसर्गिक दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे.
इगतपुरीचा सर्वात लोकप्रिय धबधबा आहे. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात पूर्णपणे बहरलेला असतो.
त्रिंगळवाडी किल्ला हा इतिहास आणि साहसाचा अनुभव देणारा आहे. किल्ल्यावरून रेल्वे ट्रॅक, दऱ्या आणि आजूबाजूच्या पर्वतांचे नय नरम्य दृश्य दिसते.
हे धरण शांत ठिकाण आहे. येथे असलेली हिरवळ मनाला भारावून टाकते. कुटुंबीयांसोबत वन डे ऑऊट करायचे असेल तर हे ठिकाणी भारी आहे.
हे ठिकाण खोल दऱ्या आणि वळणदार रस्त्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथून घाटांचे विहंगम दृश्य दिसते.
इगतपुरी मुंबईपासून १४८ किलोमीटर अंतरावर आहे, त्यामुळे रस्त्याने पोहोचणे सोपे आहे. जर तुम्ही खाजगी वाहनाने प्रवास करत असाल तर तुम्ही फक्त ३ तासांत तिथे पोहोचू शकता.