Guhagar Tourism: विकेंड ट्रीपसाठी परफेक्ट ठिकाण! मुंबईहून फक्त ५ तासांत पोहोचाल सुंदर गुहागरला

Surabhi Jayashree Jagdish

गुहागर

गुहागर हा रत्नागिरी जिल्ह्यातील एक सुंदर तालुका आहे, जो आपल्या शांत, स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांसाठी आणि धार्मिक स्थळांसाठी प्रसिद्ध आहे.

गुहागर समुद्रकिनारा

गुहागरचा किनारा हा पांढऱ्या वाळूचा आणि अत्यंत स्वच्छ आहे. किनाऱ्यावर नारळी-पोफळीच्या बागांची सुंदर किनार आहे, ज्यामुळे इथे शांत आणि आल्हाददायक वातावरण मिळतं.

वेळणेश्वर समुद्रकिनारा

हा किनारा अर्धचंद्राकृती आकाराचा आहे आणि नारळाच्या झाडांनी वेढलेला आहे. किनाऱ्याजवळ १२०० वर्षांपूर्वीचे अत्यंत प्राचीन वेळणेश्वर शंकराचं मंदिर आहे.

हेदवीचा दशभुज गणेश मंदिर

हेदवीतील हे मंदिर त्याच्या दशभुज असलेल्या गणेशाच्या दुर्मिळ मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. ही मूर्ती पांढऱ्या संगमरवरी दगडाची आहे आणि पेशव्यांच्या काळात बांधली गेली होती.

बामणघळ

हे हेदवी गावाजवळ असलेले एक अद्भूत नैसर्गिक ठिकाण आहे. समुद्राच्या लाटांचा खडकावर अनेक वर्षे मारा झाल्यामुळे इथे सुमारे ३५ फूट लांबीची एक अरुंद खडक घळ तयार झाली आहे.

गोपाळगड किल्ला

हा किल्ला जयगड खाडीच्या मुखाजवळ शास्त्री नदी आणि समुद्राच्या संगमावर वसलेला आहे. हा १६ व्या शतकातील किल्ला असून समुद्री मार्गाचे नियंत्रण करण्यासाठी तो महत्त्वाचा होता.

जयगड किल्ला आणि लाईटहाऊस

हा किल्ला १६ व्या शतकातील असून समुद्र आणि शास्त्री नदीच्या खाडीच्या संगमावर एका उंच टेकडीवर आहे. किल्ल्याची बांधणी चांगली शाबूत असून, इथले दीपगृह खूप प्रसिद्ध आहे.

श्री व्याडेश्वर मंदिर

हे मंदिर गुहागर शहराच्या मध्यभागी स्थित आहे आणि हे येथील प्रमुख धार्मिक केंद्र आहे. हे मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे आणि याची रचना पारंपरिक कोकणी शैलीची आहे.

सर्वाधिक शिकलेला मुघल बादशाह कोण होता?

येथे क्लिक करा