Satish Daud
भारतीय हवामान विभागानं यंदाच्या मान्सूनसंदर्भात मोठी अपडेट दिली आहे.
मान्सूनचं आज केरळमध्ये आगमन झालं असल्याचं भारतीय हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे.
दरवर्षी १ जून रोजी मान्सूनचं आगमन केरळमध्ये आगमन होत असतं.
यंदा तब्बल ७ दिवस उशिरानं मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे.
नैऋत्य मोसमी पावसाने केरळमध्ये आज, ८जून २०२३ रोजी प्रवेश केला आहे.
मान्सूनची वाटचाल दक्षिण अरबी समुद्र आणि मध्य अरबी समुद्र आणि लक्षद्वीप भागात सुरु आहे.
केरळ, दक्षिण तामिळनाडू, कोमोरिन भाग, मन्नारचे आखातात मान्सून दाखल झाला आहे.
महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन १६ जूनपर्यंत होईल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.
मान्सूनच्या आगमनामुळे देशभरातील जनतेसोबतच शेतकऱ्यांना आनंद झाला आहे.