Manasvi Choudhary
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज १२ जिल्ह्याचे पालकमंत्रीपद जाहीर केले आहे.
१२ जिल्ह्यांच्या नवीन पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे.
चंद्रकांत पाटील यांना सोलापूर आणि अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली आहे.
आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित यांना भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर कोल्हापूर जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे.
अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यावर गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली आहे
कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबादारी दिली आहे.