Bharat Jadhav
महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध पशुपालन योजनांतर्गत शेतकऱ्यांना ५० ते ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते.
शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून पशुपालकांना आर्थिक बळ दिले जाते. पाच दुधाळ जनावरांच्या प्रकल्पासाठी ११ लाख ३५ हजार १८० रुपयांचे अनुदान मिळते.
शेळी-मेंढीपालनासाठी ११ लाख ३८ हजार ५५४ रुपयांच्या प्रकल्पावर सर्वसाधारण प्रवर्गाला ५० टक्के व अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गाला तब्बल ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान उपलब्ध आहे, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा राज्य योजना समन्वयक डॉ. संतोष शिंदे यांनी दिली.
साधारण / खुला वर्ग : ५० टक्के अनुदान (दोन गाईंसाठी सुमारे ७८ हजार ४२५ रुपये किंवा म्हशींसाठी ८९ हजार ६२९ रुपये ).
अजा/अज (SC/ST) वर्ग : ७५ टक्के अनुदान (दोन गाईंसाठी सुमारे १ लाख १७ हजार ६३८ रुपये किंवा म्हशींसाठी १ लाख ३४ हजार ४४३) रुपये दिले जातात.
३० टक्के महिला आणि ३ टक्के दिव्यांग लाभार्थ्यांना प्राधान्य दिले जाते. जनावरे किमान ३ वर्षे सांभाळणे बंधनकारक असतं.
५ दुधाळ जनावरे (गाई/म्हशी), गोठा (शेड), आणि आवश्यक उपकरणे यांसह प्रकल्पासाठी सुमारे ११.३५ लाख रुपयांपर्यंतची मदत दिली जाते. सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५० टक्के आणि अनुसूचित जाती/जमातीसाठी ७५ टक्के अनुदान मिळते.