Alisha Khedekar
सलग सुट्ट्यांमुळे नागरिक घराबाहेर पडले असून पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांची मोठी गर्दी वाढली आहे.
लोणावळ्यात टायगर पॉईंट भुशी डॅम रोडला वाहनांच्या रंगाच रांगा लागल्या आहेत. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी वाढली आहे.
भीमाशंकर परिसरात पर्यटकांची मांदियाळी. सह्याद्रीच्या हिरवाईने आणि धबधब्यांनी पर्यटकांचे लक्ष वेधले असून सलग सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी
सलग सुट्ट्यांचा फायदा घेत नागरिक बाहेर पडल्याने मुंबई-नाशिक मार्गावर वाहनांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
वीकेंडसाठी कोकणाकडे निघालेल्या पर्यटकांमुळे मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी वाहतुकीचा वेग कमी झाला आहे.
सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीकडे जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढली असून मार्गावर वाहनांची मोठी गर्दी झाली आहे.
सलग सुट्ट्यांमुळे पर्यटनस्थळांवर गर्दी वाढली असून मुंबईकडून जाणाऱ्या प्रमुख मार्गांवर वाहतूक कोंडीचा परिणाम जाणवत आहे.