ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित केले जात आहे.
अप्पासाहेब धर्माधिकारी हे थोर निरूपणकार कै. नानासाहेब धर्माधिकारी यांचे चिंरजीव होत.
अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे नाव दत्तात्रेय नारायण धर्माधिकारी असे आहे.
त्यांचा जन्म १४ मे १९५१ मध्ये रायगड जिल्ह्यात रेवदंडा ह्या ठिकाणी झाला आहे.
अप्पासाहेब यांचे बालपण प्राथमिक माध्यमिक शिक्षण ह्या रेवदंडा इथेच पुर्ण झाले आहे.
वडिल निरूपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांच्याकडून अप्पासाहेबांना निरूपणाचा वारसा लाभला.
नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने बाल संस्कारवर्ग, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, व्यसनमुक्ती, परिसर स्वच्छता, वृक्षलागवड, पर्यावरण संवर्धन, विहिरी पुनर्भरण, शैक्षणिक साहित्य वाटप असे समाजकार्य अप्पासाहेब यांच्या हातून होत आहेत.
त्यांच्या या कार्याची दखल घेऊन अप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीयमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणारा सर्वात मोठा पुरस्कार आहे.