Shruti Vilas Kadam
स्वराज्याच्या छत्रपती होणाऱ्या पहिल्या महाराणी ताराबाई भोसले होत्या. महाराणी ताराबाई भोसले या छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी होत्या.
महाराणी ताराबाई भोसले यांचे वडील हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती होते.
महाराणी ताराबाईंचे लग्न छत्रपती राजाराम महाराजांशी १६८७ च्या सुमारास झाले.
२५ मार्च १६८९ रोजी मोगलांनी रायगडास वेढा घातला असता त्या छत्रपती राजाराम यांच्यासह रायगडावरून निसटून गेल्या.
३ मार्च १७०० रोजी छत्रपती राजाराम यांचा सिंहगड किल्ल्यावर मृत्यू झाल्यानंतर मराठी साम्राज्याची सूत्रे ताराबाईंच्या हाती आली.
महाराणी ताराबाई औरंगजेबाच्या प्रचंड मुघल सैन्याविरुद्ध लढा देताना केवळ २४ ते २५ वर्षांच्या होत्या.
महाराणी ताराबाईंनी औरंगजेबासारख्या मुत्सदी, नृशंस व कपटी सम्राटाशी साडेसात वर्षे खंबीर लढा दिला.
छत्रपती महाराणी ताराबाई भोसले यांचे 1761 साली निधन झाले.