Saam Tv
तुम्हाला नवरात्रीला येणाऱ्या विकेंडला फिरायला जायचे असेल तर तुम्ही कोल्हापुरातील अंबाबाईचे दर्शन घेवू शकता.
कोल्हापूर हे शहर पर्यटकांच्या प्रचंड आवडीचे ठिकाण आहे. महालक्ष्मी अंबाबाई मंदिर, कोल्हापूर हे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईचे मंदिर आहे.
कोल्हापुरमधील अंबाबाईच्या मंदिरात घटस्थापना झाली आहे. हे मंदिर महाराष्ट्रात असलेल्या मंदिरांच्या साडेतीन पीठांपैकी एक आहे.
तुम्ही तिथे जावून अंबाबाईचे दर्शन घेवू शकता. दरम्यान तिथल्या अनेक देवळांचे सुद्धा दर्शन घेवू शकता.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तिथे तोफेची सलामी दिली जाते. हे पाहणे शुभ मानले जाते.
नवरात्रीच्या नऊ दिवस कोल्हापुरात भव्य पुजा केली जाते. बरेच भक्त लांबून या पुजेसाठी मंदीराला भेट देतात.
या वर्षी अंबाबाईची सिंहासनारुढ महालक्ष्मी, गजेंद्रलक्ष्मी, महिषासुरमर्दिनी अशी अनेक रुपे आपल्याला पाहता येणार आहेत.
कोल्हापुरात भाविकांची लांब सडक रांग लागलेली असते. लोक अगदी पहाटेपासुन दर्शनासाठी रांगा लावत असतात. तुम्ही सुद्धा या विकेंडला तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत अंबाबाईच्या दर्शनाला जावू शकता.