ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळ्याप्रमाणे पावासाळ्यात देखील महाबळेश्वरची नैसर्गिक सुंदरता आणखी खुलून येते.
येथे फिरण्यासाठी अनेक प्रसिद्ध ठिकाणं आहेत. येथील आर्थर सीट आणि एलिफंट पॉईंट सारख्या ठिकाणांवरुन तुम्ही निसर्गाच्या मनमोहक दृश्यांचा आनंद घेऊ शकता.
महाबळेश्वरमधील सर्वात प्रसिद्ध पॉईंट म्हणजे, आर्थर सीट पॉईंट. हवामान स्वच्छ असल्यास तुम्ही या पॉईंटवरुन तोरणा किल्ला, रायगड किल्ला पाहू शकता.
पावसाळ्यात ओसंडून वाहणार हा धबधबा पिकनिकसाठी एक परफेक्ट ठिकाण आहे. या ठिकाणाची सुंदरता तुमच्या मनाला भुरळ घालेल.
वेण्णा लेक हे मानवनिर्मित लेक आहे. तुम्ही येथे बोटीने प्रवास करु शकता. पावसाळ्यात भेट देण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.
आर्थर पॉईंटपासून काही अंतरावरच ईको पॉईंट आहे. येथून तुम्ही खोल दऱ्या आणि उंच पर्वतरांगाचे सुंदर दृश्ये पाहायला मिळतील.
बॉम्बे पॉईंटला सनसेट पॉईंट असेही म्हणतात. हे महाबळेश्वरमधील सर्वात प्रसिद्ध ठिकाण आहे.