Dhanshri Shintre
आजकाल प्रत्येकजण कमी खर्चात चांगले जीवन जगण्याचा विचार करतो, ज्यासाठी स्मार्ट उपाय शोधत आहे.
जेव्हा स्थायिक होण्याचा विचार येतो, तेव्हा सर्वप्रथम स्वस्त आणि उत्तम जीवनशैली असलेले शहर कोणते आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे असते.
माहितीनुसार, तिरुवनंतपुरम हा भारतातील सर्वात स्वस्त शहर मानला जातो, त्याच्या परवडणाऱ्या खर्चाचे कारण जाणून घेऊया.
केरळची राजधानी तिरुवनंतपुरम येथे कमी खर्चात उत्कृष्ट जीवनशैली मिळते, ज्यामुळे हे शहर परवडणाऱ्या वास्तव्याकरिता प्रसिद्ध आहे.
येथील घरभाडे, जेवण, वाहतूक आणि दैनंदिन खर्च मोठ्या शहरांपेक्षा ३०-४०% कमी असल्याने बजेटमध्येही आरामदायी जीवन शक्य आहे.
येथील १ बीएचके फ्लॅटचे भाडे दरमहा ७०००-१०,००० रुपये असून, मुंबई- दिल्लीसारख्या शहरांच्या तुलनेत हे खूप स्वस्त आहे.
येथे भाज्या, फळे आणि घरगुती वस्तू कमी किमतीत सहज मिळतात, त्यामुळे दैनंदिन खर्च इतर शहरांच्या तुलनेत कमी राहतो.
येथील ऑटो, बस आणि टॅक्सीचे भाडे किफायतशीर असून, लोक स्वच्छ आणि शांत वातावरणात राहतात, त्यामुळे दैनंदिन प्रवास आणि जीवन दोन्ही सोयीचे ठरते.