ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सध्या सगळंच डिजिटल होतंय. पण त्याचबरोबर फसवणुकीचे प्रकारही वाढलेत.
शॉपिंगपासून ते अन्य व्यवहारांपर्यंत क्रेडिट आणि डेबिट कार्डचा वापर सध्या वाढला आहे.
सध्याच्या घडीला बहुतांश लोक क्रेडिट कार्डचा वापर करतात.
अशा परिस्थितीत क्रेडिट कार्ड हरवला किंवा चोरीला गेला तर काय कराल?
क्रेडिट कार्ड हरवला किंवा चोरी गेला तर सर्वात आधी याची माहिती संबंधित कंपनीला द्यावी.
संभाव्य मोठं नुकसान टाळण्यासाठी लवकरात लवकर कार्ड ब्लॉक करण्यास सांगावे.
क्रेडिट कार्ड हरवला किंवा चोरीला गेला तर, याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी.
आपल्या क्रेडिट कार्डमधून होणाऱ्या व्यवहारांवर नीट लक्ष ठेवण्याची गरज आहे.