Bharat Jadhav
भगवान श्रीकृ्ष्णांचे विद्वत्ता, करुणा, धैर्य आणि उद्देशपूर्ण जीवन कसे जगावे, याबद्दल साधे पण सखोल धडे देत असते. श्रीकृष्णांचे विचार कोणत्याही एका ऐतिहासिक काळापुरते मर्यादित नाहीत; आजही अधिक अर्थपूर्ण आणि शांत जीवन जगू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी ते तितकेच समर्पक आहेत.
भगवान श्रीकृष्णांकडून मिळणाऱ्या सर्वात मौल्यवान शिकवणींपैकी एक म्हणजे, फळाची अति आसक्ती न ठेवता आपले सर्वोत्तम प्रयत्न करणे. यश आणि अपयशावर अनेकदा आपल्या नियंत्रणाबाहेरील घटकांचा प्रभाव असतो, परंतु आपली प्रामाणिकपणा आणि निष्ठा नेहमीच आपल्या नियंत्रणात असतात. यामुळे प्रामाणिकपणे काम करावे. त्याचे जे काही परिणाम मिळतील त्यांचा स्वीकार संयमाने व आदराने करावे.
आयुष्य हे अनिश्चितता, निराशा आणि बदलांच्या क्षणांनी भरलेले असते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, कठीण परिस्थितीतही आंतरिक संतुलन राखणे हेच खरे सामर्थ्य असते. शांत मन आपल्याला स्पष्टपणे विचार करण्यास, उत्तम निर्णय घेण्यास मदत करत असतात. यासह समस्यांना घाबरून न जाता धैर्याने सामोरे जाण्यास मदत करते.
भगवान श्रीकृष्णांच्या शिकवणीत करुणा आणि सहानुभूतीला केंद्रस्थान आहे. प्रत्येक व्यक्ती आदर, समज आणि दयाळूपणाची हकदार असते. दयाळूपणाचे छोटे छोटे प्रयत्नही नातेसंबंध दृढ करू शकतात. गैरसमज दूर करू शकतात. आपल्या सभोवतालचे जग अधिक सुसंवादी बनवू शकतात.
भगवान श्रीकृष्ण ज्ञान आणि आत्मजागरूकतेच्या महत्त्वावर भर देतात. शिकणे म्हणजे केवळ पुस्तके वाचणे किंवा औपचारिक शिक्षण घेणे इतकेच मर्यादित नाही; तर ते अनुभव, चिंतन आणि स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यामधूनही साध्य होत असते. प्रगतीसाठी सदैव तत्पर राहिल्यामुळे आपण अधिक ज्ञानी आणि नम्र बनत असतो.