Manasvi Choudhary
अनेक महिला व मुली केसांच्या समस्येने त्रस्त आहे. केस गळणे, केसांत कोंडा होणे, केस तुटणे या समस्येने महिनोमहिने केसांची वाढत होत नाही अशावेळी महिला पार्लरची ट्रिंटमेट घेतात.
मात्र आज आम्ही तुम्हाला केसांच्या वाढीसाठी सोपा घरगुती उपाय सांगणार आहे. केसांची वाढ चांगली होण्यासाठी केसांना पोषण मिळणं गरजेचे आहे.
केसांच्या वाढीसाठी मेथीच्या दाण्याचा उपाय करा. मेथी दाणे दहीमध्ये रात्रभर भिजत ठेवा. नंतर हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
मेथीच्या दाण्याची पेस्ट खोबरेल तेलात मिक्स करून केसांच्या टाळूला लावा. केसांना मेथीच्या दाण्याचा उपाय केल्यानंतर साधारण १० ते १५ मिनिटांनी केस धुवा. आठवड्यातून एकदा नक्की हा उपाय करा.
हा हेअर मास्क केसांच्या टाळूला आणि केसांना लावा. १० ते १५ मिनिटे हा मास्क केसांवर राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने आणि सौम्य शॅम्पूने केस धुवा.
मेथी दाण्यामुळे टाळूचे रक्ताभिसरण सुधारते आणि केसांची मुळे मजबूत होतात.
हा उपाय केल्याने केसांना पोषण मिळाल्याने केसांची वाढही चांगली होते आणि केस गळती रोखली जाते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.