कोमल दामुद्रे
हल्लीच्या तरुणांना लग्नासारख्या प्रथेमध्ये स्वत:ला बांधून घेणे आवडत नाही.
आजकाल लिव्ह इन रिलेशनशिपचा खूप ट्रेंड आहे.
लग्नाआधी एकमेकांना समजून घेण्यासाठी लोक लिव्ह-इनमध्ये राहणे पसंत करत आहेत.
तुम्ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असाल तर या खास गोष्टी लक्षात ठेवा.
अशावेळी तुम्ही तुमचे नाते कसे सांभाळू शकता हे जाणून घ्या.
जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहात असाल तर एकमेकांच्या वैयक्तिक गोष्टीत प्रवेश करू नका.
लिव्ह इन रिलेशनशिप पार्टनरने घरातील कामात मदत करावी. सर्व कामांचा बोजा जोडीदारावर टाकू नका
लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा सर्वात मोठा नियम हा आहे की तुम्ही कोणत्याही एका जोडीदारावर संपूर्ण घराचा खर्च टाकू नये.
तुमच्या जोडीदारासोबत चांगले नाते निर्माण करायचे असेल तर त्यांच्यासोबत स्वयंपाकात मदत करण्यासोबतच एकत्र बसून जेवण करा
अनेकदा लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असताना पार्टनर एकमेकांच्या जवळ येतात तर हे नाते कधी जिव्हाळ्याचे बनते कळत नाही.