Shruti Vilas Kadam
सर्वप्रथम आपल्या होठांवर थोडं पेट्रोलियम जेली लावा, नंतर त्यावर मॅट लिपस्टिक लावा. तुम्हाला लगेचच ग्लॉसी आणि शाइनी लुक मिळेल.
मॅट लिपस्टिक लावल्यानंतर वरून ट्रांसपेरेंट लिप ग्लॉस लावा. लगेचच ग्लॉसी फिनिश मिळते. जर तुमच्याकडे रंग असलेला ग्लॉस असेल, तर तो देखील वापरता येतो.
मॅट लिपस्टिक लावण्यापूर्वी लिप बम (lip balm) लावा. यामुळे ओठांना हायड्रेट आणि ग्लॉसी लूक देतो.
आपल्या मॅट लिपस्टिकच्या वर थोडंसं एलोवेरा जेल (aloe vera gel) लावा. हे नुसतं ग्लॉसी लुक देत नाही, तर ओठांना हायड्रेशन देखील प्रदान करतो.
सुरुवातीला मॅट लिपस्टिक नंतर ग्लोस आणि पुन्हा मॅट लिपस्टिक लावा यामुळे तुमची लिपस्किटचा ग्लॉस जास्त टिकतो.
जाड आणि सुखे ओठ वाटू नयेत म्हणून थोडी कमी मॅट लावा आणि लिप बम, ग्लॉस किंवा एलोवेरा जरा जास्त लावा.
नवीन ग्लॉसी लिपस्टिक खरेदी करण्यासाठी बजेट नसेल तर तुम्ही या ट्रिक्स वापरून आपल्या जुन्या मॅट लिपस्टिकला ग्लोसी टच देऊ शकता.