साम टिव्ही ब्युरो
हिवाळ्यात थंडी आणि व्हॅसलिन हे समीकरण ठरलेलंच असते.
व्हॅसलिन एक पेट्रोलियम जेली आहे.
व्हॅसलिन जेली पांढर्या किंवा पिवळ्या रंगामध्ये असते.
पेट्रोलियम जेली म्हणजेच व्हॅसलिन हे सर्वाकडे सहजपणे उपलब्ध असते.
हिवाळ्यामध्ये या जेलीचा वापर माॅश्चरायझर म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो.
पेट्रोलियम जेली म्हणजेच व्हॅसलिन ओठांना लावल्यामुळे ड्रायनेस कमी होतो.
फाटलेल्या व कोरड्या पडलेल्या ओठांवर जर तुम्ही व्हॅसलिन लावली तर ते मऊ होण्यास मदत करतात.