ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मासिक पाळीदरम्यान महिलांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.
जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी फास्टींग किंवा डाएटींग करत असाल. तर त्याचा परिणाम थेट तुमच्या मासिक पाळी सायकलवर होतो.
पॅड (सॅनिटरी नॅपकिन) बदलण्यास कंटाळा करू नका. अनेकदा मुली,महिला बराच वेळ एकच पॅड वापरतात. परंतु यामुळे संसर्ग होऊ शकतो. तर ठराविक वेळानंतर पॅड बदला.
मासिक पाळी दरम्यान पौष्टिक आहाराचे सेवन करा.
पाळी दरम्यान साबणाने आपले गुप्तांग स्वच्छ करू नका. ओल्या टिश्यूचा पेपर वापरू नका. असे केल्याने कोरडेपणा वाढू शकतो जे खाज सुटणे किंवा इतर संसर्गामुळे आपल्याला अस्वस्थ करते.
मासिक पाळी दरम्यान थंड गोष्टी जसे दही, ताक, थंड पेय इत्यादी घेणे टाळा. यामुळे पोटात सूज वाढते आणि वेदना वाढतात. याशिवाय लोणचे, लिंबू आणि इतर आंबट गोष्टी देखील टाळाव्यात.