ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकाल मोबाईल आणि इंटरनेट प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग झाल्या आहेत.
प्रत्येकजण आपापल्या आवडीनुसार त्याचा योग्य तो वापर करतो.
त्यामध्ये मोबईल सर्च करण्याचे प्रमाण जास्त आहे.
माहितीनुसार, तरूण मुली गुगल इंटरनेटचा वापर जास्त करतात.
मुली रात्र-दिवस गुगलवर काय सर्च करतात हे जाणून घ्या
शॉपिंग हा मुलींचा अत्यंत आवडता विषय. नवीन वस्तू खरेदी करायची असेल तर ट्रेंड काय आहे, ते बघत विविध शॉपिंग साईट त्या पाहतात.
अनेक तरूण मुली रात्री इंटरनेटवर ब्यूटी टिप्स विषयी माहिती घेतात. १७ ते ३४ या वयोगटातील बहुतांश मुलींना इंटरनेटवर वेगवेगळे कॉस्मेटिक्स, मेकअप टिप्स, लेटेस्ट ब्यूटी ट्रेण्ड्स याविषयी माहिती घेतात
अनेक मुलींना गाणी ऐकायला खूप आवडतात. दिवसभराच्या व्यस्त कामात ती मनासारखी ऐकता येत नाहीत. अशा वेळी अनेकजणी रात्रीच्या वेळी इंटरनेटवर गाणी सर्च करण्याला प्राधान्य देतात.