ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सर्च इंजिन गुगलवर लोक अनेक प्रकारच्या गोष्टी शोधतात.प्रत्येक व्यक्ती आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी या गुगलवर सर्च करते.
मात्र महिला लग्नांनतर अशा काही गोष्टी सर्च करतात ऐकूनच सर्वाना धक्काच बसेल.
लग्न झाल्यावर स्त्रिया गुगलवर सर्वाधिक व वारंवार काय सर्च करतात ?
लग्न झालेल्या जास्तीत जास्त स्त्रि आपल्या पतीबाबतच्या अनेक गोष्टी गुगलसर्च करतात.
अनेकदा स्त्रियांना त्यांच्या पतीला काय आवडते याबाबत प्रश्न सतावत असतो यामुळेच त्या आपल्या पतीची पसंत आणि नापसंत याबाबत गुगलला अधिकाधिक प्रश्न विचारतात.
अशा काही स्त्रिया असतात ज्यांना आपल्या पतीला आनंदी ठेवण्याचा उपाय हवा असतो. ज्या स्त्रियांना आपल्या पतीने आपलेच रहावे असे वाटत असते. अशा स्त्रियांच्या मनात अनेक प्रश्न असतात आणि याबाबतीत गुगलवर सर्च करत करतात.
पतीला केवळ आपलेसे करून ठेवण्यासाठी स्त्रिया अनेकदा धडपडत असतात एका संशोधनानुसार लक्षात आले आहे की, पती आपल्या मागे मागेच कसा येईल ? हे त्या सर्च करतात.
बाळाला जन्म देण्यासाठी कोणती वेळ योग्य आहे ? यासाठी नव-याला कसं तयार करावं ? हे देखील गुगलवर स्त्रिया सर्च करतात.
महिला लग्नांनंतर आपल्या कुटुंबाला अधिक वेळ देत असतात. त्यामुळे घरच्या घरी बसून आणि कुटुंब सांभाळत कोणते करिअरकरता येऊ शकते हे सर्च करतात.