How To Clean Silver Anklet: पैंजण काळे पडलेत? स्वयंपाकघरातील 'या' पदार्थांनी घरच्या घरी चमकवा, खुलून दिसेल पायाचे सौंदर्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

 स्त्री सौंदर्य

स्रिया पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी पायात पैंजण घालतात. बहुतेक मुलींना तर स्टाईलश पैंजण घालायला आवडते.

How To Clean Silver Anklet | Canva

आवड

चांदीच्या दागिन्यांची आवड ही प्रत्येकीला असतेच, मात्र, चांदीचे दागिने जसे परिधान करायला आवडतात, तसेच ते लवकर काळे देखील पडतात. 

Silver Anklet | Canva

काळजी

चांदीच्या पैंजणाची योग्य पध्दतीने काळजी घेतली नाही तर ते काळे पडतात आणि त्यांची चमक कमी होते.

Silver Anklet | Canva

उपाय

या घरगुती उपायांनी तुमच्या काळ्या पडलेल्या चांदीच्या पैंजणाची चमक मिळवा

Silver Anklet | Canva

बेकिंग सोडा

एका भांड्यात बेकिंग सोडा आणि थोडे पाणी मिक्स करा.  चांदीच्या दागिन्यांवर लावून ते पाण्याने धुवून कोरडे करा. यामुळे चांदीच्या दागिन्यावरचा काळेपणा लगेच दूर होईल

Baking Soda | Canva

व्हिनेगर

चांदीवरचाचा काळेपणा दूर करण्यासाठी व्हिनेगर देखील एक चांगला उपाय आहे. व्हिनेगरमध्ये मीठ मिसळून चांदीच्या भांड्यावर लावा. थोडा वेळ घासून नंतर कोमट पाण्याने धुवा. यामुळे चांदीवर काळेपणा निघून जाईल

Vinegar | Canva

टूथपेस्ट

चांदी स्वच्छ करण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे टूथपेस्ट. तुमच्या काळे पडलेल्या पैंजणवर टूथपेस्ट लावा काही वेळातच नव्यासारखे चमकू लागतील

Toothpaste | Canva

सॅनिटायझर

हँड सॅनिटायझर चांदी स्वच्छ करण्यासाठी देखील वापरू शकता. एका भांड्यात सॅनिटायझर घ्या त्यात चांदी भिजवून ठेवा. साधारण अर्ध्या तासानंतर स्क्रबने स्वच्छ करा. यामुळे चांदीचा काळेपणा दूर होईल.

Hand Sanitizer | Canva

NEXT: Adhik Maas 2023 :अधिक महिन्यात काय करावे अन् काय करू नये?

येथे क्लिक करा...