ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
रोजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष होतं.यामुळेच आरोग्यासंबंधीत अनेक समस्या निर्माण होतात.
यातील वजन वाढीची समस्या ही अनेकांना भिडसावते यामुळे अशी काही फळे आहेत ज्यामुळे तुमचं वजन कमी होण्यास मदत होईल
दररोज एक जरी सफरचंद खाल्ले तरी ते आरोग्यासाठी उत्तम असतं. सफरचंद मध्ये भूक भागवण्याची क्षमता असते त्यामुळे वजन कमी करण्यासही ते मदत करतं.
द्राक्षेसुद्धा शरीरातील हानीकारक कोलेस्ट्रॉल कमी करतं त्यामुळे वजन कमी होते
पपईसुद्धा हानिकारक कोलेस्टेरॉल वेगाने कमी होते. पपईमध्ये फायबर, अँटीऑक्सिडंट असे पोषक घटक असतात. त्यामुळे पपई वजन कमी करण्यास अधिक मदत करते.
सकाळी कोमट पाण्याच लिंबू उपाशीपोटी पिल्याने फायदा होतो.हानिकारक कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी लिंबू हे अधिक फायदेशीर आहे.
किवीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, फोलेट आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.