ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जेवताना आहारासोबत ताक पिणे गुणकारी समजले जाते. अन्नपचन सहजरित्या होते.
ताकाचा महत्वाचा गुण म्हणजे अजीर्णामुळे पोटात साठलेला आमदोष कमी होतो.
ताक शरीरात असलेले कोणत्याही प्रकारचे अपचन, अरुचीचे विकार कमी करण्यास मदत करतो.
ताकामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन, पोटॅशियम, प्रोबायोटिक्स, फॉस्फरस आणि अँटी-ऑक्सिडंट असे घटक मुबलक प्रमाणात असतात.
उन्हाळ्यात अनेकदा शरीरात पाण्याची कमतरता असल्याने डिहायड्रेशनची समस्या उद्भवते. अशावेळी उन्हाळ्यात डिहायड्रेशनपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी ताकाचे सेवन करा
ताक प्यायल्याने वजन कमी होण्यास देखील मदत होते.