ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उत्तम शारिरिक आरोग्यासाठी केसांची निगा राखणे देखील महत्वाचे आहे.
यासाठी आठवड्यातून कितीवेळी केस धुवावेत जाणून घ्या
सर्वात महत्वाचे म्हणजे केसांची निगा राखणे प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळे असू शकते.
आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत हे तुमच्या जीवनशैलीवरही अवलंबून असते.
ज्या व्यक्ती सतत घरातच राहतात, ज्यांना बाहेर पडण्याची गरज पडत नाही, ज्यांना फारसे काम न करावे न लागल्याने फारसा घाम देखील येत नाही अश्या व्यक्तींनी आठवड्यातून तीन वेळा केस धुवावेत
सतत बाहेर फिरावे लागते, ज्याच्या केसांवर सतत ऊन, धुळीचा मारा होत असतो, किंवा ज्यांना सतत काम केल्याने घाम येत राहतो, त्या व्यक्तींना जवळजवळ रोजच केस धुणे गरजेचे आहे.
दरररोज केस धुणाऱ्यांनी केमिकलच्या अतिवापराने केसांमधील नैसर्गिक तेले निघून जाऊन केस रुक्ष, कोरडे बनू लागतात. त्यामुळे आठवड्यातून जास्त केस धुण्याची आवश्यकता असली, तरी केसांना तेलाची मालीश करून पोषण मिळेल याची काळजी घ्यावी.