ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रत्येक माणसालाच श्रीमंत होण्याची इच्छा असते. त्यासाठी तो काबाड कष्ट करत असतो.
कितीही मेहनत केली तरी असं म्हणतात की, पाहिजे तसं यश मिळत नाही.
पण जे लोक श्रीमंत होतात त्यांच्यात असं काय खास आहे? हे आज आपण पाहूया
आवश्यक कामांच्या नोंदी ठेवतात, कामचूकारपणा करत नाही तर, कामं पुर्ण होत नाहीत तोवर ते दुसऱ्या कामांना हात लावत नाहीत.
यशस्वी लोक दुसऱ्यांना ऐकून घेणं पसंत करतात. आणि दुसरं कोणी बोलत असेल तेव्हा मध्ये बोलत नाही.
चुका सगळ्यांकडू होतात. पण फरक ती चुक स्वीकारल्यानंतर पडतो. सामान्य लोक जेव्हाही काही चुक करतात तेव्हा त्यासाठी कायम दुसऱ्यांना जबाबदार ठरवतात.
यशस्वी लोक फक्त स्वतः चुक स्वीकारतच नाहीत तर त्यातून शिकण्याचाही प्रयत्न करतात.
सामान्यतः जेव्हा कोणाला जबाबदारी दिली जाते ती त्यांच्याकडून पुर्ण होऊ शकली नाही तर ते त्यासाठी अनेक बहाणे बनवू लागतात.
यशस्वी लोकं कधीही आपल्या जबाबदाऱ्यांपासून पळ काढत नाहीत. त्यांना दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करतात.
यशस्वी लोकं कायम आपले ध्येय ठरवून काम करत असतात. जोवर आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे हे माहित नसेल तोवर आपण पुढे जाऊ शकत नाही.