Chetan Bodke
‘माझ्या नवऱ्याची बायको’ आणि ‘जय मल्हार’ या दोन्ही मालिकांमुळे अभिनेत्री ईशा केसकर प्रकाशझोतात आली आहे.
'पती गेले गं काठेवाडी' ह्या नाटकातील भूमिका तर 'शेर शिवराज' आणि 'गर्लफ्रेंड' या चित्रपटातील ईशाची भूमिका बरीच गाजली.
ईशा नेहमीच सोशल मीडियावर आपल्या फॅशनमुळे आणि फोटोंमुळे जोरदार बरीच चर्चेत असते.
सोशल मीडियावर नेहमीच ईशा वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.
नव्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने जांभळ्या गाऊनमध्ये सुंदर फोटोशूट शेअर केले आहेत.
ईशाच्या मोहक रुपाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे, तिने हा लूक एका कार्यक्रमासाठी केला.
नुकतंच ईशाने 'होऊदे धिंगाणा' या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती, या शोसाठी तिने हा खास लूक केला आहे.
'लक्ष्मीच्या पाऊलांनी' या मालिकेमध्ये ईशा केसकर 'कला खरे' हे पात्र साकारते.