Gangappa Pujari
गौतमी पाटील नाव ऐकल की पोरांच अंग आपोआप थिरकायला लागतं. सध्या गावागावात अन् सोशल मीडियावर तिचीच चर्चा पाहायला मिळते.
आपल्या धमाकेदार डान्सने अन घायाळ करणार्या अदांनी गौतमीने तरुणाईला वेड लावले आहे.
पोरांच्या स्टेटसला, ध्यानी,मनी अन स्वप्नातही सध्या गौतमीचीच लावणी वाजताना दिसते.
गावाच्या यात्रेत नेत्यांच्या वाढदिवसाला, गौतमी शिवाय मजा न्हाय अशीच हवा सगळीकडे पाहायला मिळत आहे.
पण सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या गौतमीचे बालपण खुप संघर्षमय राहिले आहे.
तिच्या जन्मानंतर तिचे वडील तिला व तिच्या आईला सोडून निघून गेले. यानंतर ती व तिची आई तिच्या आजोळी राहू लागली.
घरच्या परिस्थितीमुळे गौतमीने अनेक शोमध्ये बॅक डान्सर म्हणुन काम केले आहे.
गौतमीने पहिल्यांदा अकलूज येथील लावणी महोत्सवात बॅक आर्टिस्ट म्हणून सादरीकरण केले. यावेळी गौतमीचे मानधन होत 500 रुपये.
पण कधीकाळी 500 रुपयात डान्स करणारी गौतमी आता एका कार्यक्रमाचे आता 1 ते दीड लाख इतके मानधन घेते.