Priya More
स्वयंपाक घरात जेवणाची चव वाढवण्यासाठी वापरली जाणारी लवंग आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असते.
आयुर्वेदिक उपचारांसाठी लवंगचा वापर केला जातो. अनेक आजारांवर लवंग औषध म्हणून वापरले जाते.
सलग महिनाभर एक लवंग खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल.
महिनाभर एक लवंग खाल्ल्याने तुमची पचनक्रिया सुधारते. गॅस, अपचन, अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
एक लवंग चघळल्याने पोटातील पाचक रस वाढतो. रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते.
रोज एक लवंग खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.
लवंगमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. यामुळे तोंडातील दुर्गंध कमी होते आणि दातदुखी किंवा हिरड्यांच्या समस्या दूर होतात.
लवंगमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि युजेनॉल गुणधर्म असतात यामुळे शरीराची संसर्गाशी लढण्याची क्षमता वाढण्यास मदत होते.