Manasvi Choudhary
साऊथ इंडियन साड्यांची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. केवळ दक्षिण भारतातच नाही तर महाराष्ट्रात देखील महिला व मुली साऊथ इंडियन लूक करतात.
साऊथ इंडियन साड्यांचे ५ लेटेस्ट ट्रेडिंग पॅटर्न नेसल्यास तुमचा लूक उठून दिसेल.
कांजीवरम साड्यांमध्ये आता गडद रंगांऐवजी पेस्टल शेड्स लोकप्रिय आहेत. सोन्याच्या जरीऐवजी 'सिल्व्हर जरी असलेल्या या साड्या मॉडर्न टच देतात
पारंपारिक पांढऱ्या आणि सोनेरी कासवू साड्यांवर आता हाताने पेंट केलेले 'म्युरल आर्ट' किंवा मोठे फ्लोरल डिझाईन्स खूप ट्रेडिंग आहेत.
ज्यांना वजनाला हलकी पण दिसायला जड साडी हवी आहे, त्यांच्यासाठी गदवाल साडी बेस्ट आहे.
साडीच्या काठावर मंदिराच्या शिखरासारखी नक्षी असलेले 'टेंपल बॉर्डर' डिझाईन हा एक पारंपारिक साडी प्रकार आहे.
पोचमपल्ली इकत या साड्यांवरील भूमितीय डिझाईन्स खूप वेगळे आणि मॉडर्न वाटतात. तरुण मुलींमध्ये ऑफिसवेअर किंवा पार्ट्यांसाठी या साड्यांची मोठी क्रेझ आहे.