Saam Tv
दिवस महत्त्वाकांक्षा घेऊन आलेला दिवस आहे. पण दिवसाच्या शेवटी निराशा पदरी पडेल.
वेगळा निश्चय घेऊन दिवसाची सुरुवात होईल. आनंदी राहाल. इतरांवर आपला प्रभाव राहील.
कुटुंबीयांबवर अडचणी येतील. इतरांना बरोबर पुढे घेऊन. आर्थिक आवकजावक चांगली राहील.
आपल्याला भावंडांवर विशेष प्रेम वाढेल. एकत्रितरित्या प्रवासाचे योग आहेत. दिवस चांगला आहे.
शेती- बागायतीच्या कामात जोरदार सुरुवात होणार आहे. सुखाची चाहूल लागेल. मातृ सौख्याच्या दृष्टीने दिवस छान आहे.
विष्णू उपासना आज फलदायी ठरेल. संततीबरोबर आनंदाचे क्षण घालवाल.
तब्येतीच्या जरा कुरबुरी राहतील. पण नोकरी व्यवसायामध्ये सुखकर दिवस आहे. मौल्यवान ऐवज सांभाळा.
छोट्याश्या गोष्टीवरून जोडीदाराशी अबोला निर्माण होईल. पण मिळालेला वेळ कामाच्या ठिकाणी सत्कारणी लावा. व्यवसायात जोडीदाराबरोबर प्रगतीचे योग आहेत.
आजचे निर्णय उद्यावर ढकलाल. सहज कामाच्या दृष्टीने दुपारनंतर कामे केल्यास फायदेशीर ठरेल.
शिव उपासना करावी. तीर्थक्षेत्रि भेटी होतील. जवळच्या लोकांच्या भेटी होतील. त्यांच्याकडून लाभ होईल.
राजकारण आणि समाजकारणामध्ये यश मिळेल. समाजाचे ऋण फेडण्यासाठी आज विशेष उर्मी निर्माण होईल.
मैत्री सुखाचा दिवस आहे. जुने मित्र भेटतील. आनंदी दिवस आहे. जुन्या गुंतवणुकी मधून फायदा होईल.