Sakshi Sunil Jadhav
पैठणी साडी ही महाराष्ट्राची शान मानली जाते. तिच्या रंगसंगती आणि काठावरील नक्षीकामामुळे पैठणीला वेगळंच सौंदर्य मिळतं. मात्र, योग्य कॉन्ट्रास्ट ब्लाउज निवडला नाही, तर साडीचा लुक फिका पडू शकतो. त्यासाठी पुढील टिप्स करा फॉलो.
पैठणीच्या काठावर जो रंग असतो, त्याच रंगाचा किंवा त्याच्या जवळचा ब्लाउज निवडल्यास लुक जास्त उठून दिसतो.
पैठणीतील सोनरी जरीसोबत हिरवा, मरून, जांभळा किंवा नेव्ही ब्लू ब्लाउज खूपच सुंदर दिसतो.
साडीचा रंग हलका असेल, तर कॉन्ट्रास्टमध्ये डार्क रंगाचा ब्लाउज निवडा.
दोन रंगांचा ब्लाउज सध्या ट्रेंडमध्ये आहे. काठाचा आणि पदराचा रंग एकत्र वापरता येतो.
पैठणीतील मोरपिसी, निळा किंवा गुलाबी रंग ब्लाउजमध्ये घेतल्यास लुक पारंपरिक आणि रॉयल दिसतो.
ब्लाउज साधा असला तरी योग्य रंग असेल, तर साडी अधिक आकर्षक दिसते.
सण, लग्नसमारंभासाठी लाल, मरून, हिरवा किंवा रॉयल ब्लू ब्लाउज उत्तम ठरतो.
आपल्या स्किन टोननुसार ब्लाउजचा रंग निवडल्याने संपूर्ण लुक जास्त सुंदर दिसतो.