Satish Daud
डॅशिंग महिला पोलीस अधिकारी पीएसआय पल्लवी जाधव कायम चर्चेत असतात.
PSI पल्लवी जाधव सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात, अनेकदा त्या नवनवीन फोटो शेअर करत असतात.
पल्लवी जाधव या जालना पोलीस दलातील दामिनी पथकाचं नेतृत्व करतात.
सोशल मीडियावर पल्लवी यांची क्रेझ आहे. त्यांचे इन्स्टाग्रामवर एक मिलियनपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.
आर्थिक परिस्थिची जाण असलेल्या पल्लवीनं कॉलेजचे शिक्षण आणि त्यानंतर एमपीएससी परीक्षेचा अभ्यास सुरू केला.
कमवा आणि शिका या योजनेतून 2015 साली 80 टक्के गुण मिळवून एम ए मानसशास्त्र विषयाची पदवी मिळवली.
सलग तीन वर्षांच्या मेहनतीनंतर पल्लवी जाधव यांनी एमपीएससीची परीक्षा उतीर्ण केली, त्यानंतर त्यांना पोलिसांची वर्दी मिळाली.
पीएसआय पल्लवी जाधव यांना मॉडेलिंगची सुद्धा आवड आहे. त्यांनी 'ग्लॅमन मिसेस इंडिया 2020' ही सौंदर्य स्पर्धा जिंकली होती.
2021 मध्ये पल्लवी जाधव यांनी जयपूरमध्ये ग्लॅमॉन मिस इंडिया स्पर्धेत त्यांनी फर्स्ट रनरअप हा किताब जिंकला होता.