Bharat Jadhav
जमीन कसण्याच्या बदल्यात कुळ हा जमीन मालकास नियमितपणे खंड देत असेल आणि जमीन मालक तो खंड स्वीकारत असेल. ही व्यक्ती जमीन मालकाच्या कुटुंबातील नसते. अशा व्यक्तीकडे ती जमीन गहाण देखील नसते. ना ती व्यक्ती पगारावर ठेवलेला नोकर नसेल.
अशी शेतजमीन, जी मूळ मालक स्वतः कसत नसून दुसरा शेतकरी (कुळ) भाडेतत्त्वावर किंवा कराराने कसत असतो. महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, १९४८ (कुळ कायदा) नुसार अशा जमिनीबाबत काही महत्त्वाचे नियम आहेत.
कुळाच्या जमिनीचं भोगवटादार वर्ग-2 मधून भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतर करायचं असेन किंवा सातबारा उताऱ्यावरील संरक्षित किंवा कायम कुळ ही नोंद काढायची असेल तर तहसील कार्यालयात तहसिलदारांकडे अर्ज करावा लागतो.
या कलमानुसार कुळाला जमीन विकत घेण्याचा अधिकार मिळाला. ठरलेल्या किंमतीत कुळ ही जमीन कायदेशीररीत्या स्वतःच्या नावावर करू शकतात.
या कलमांतर्गत तहसीलदार पुरावे तपासून कुळाचा हक्क मान्य किंवा नाकारतात. हक्क मान्य झाल्यास सातबारा उताऱ्यावर कुळाचे नाव नोंदवले जात असते.
मूळ कुळाचे निधन झाल्यावर त्याचे कायदेशीर वारस (मुलगा, मुलगी, पत्नी इत्यादी) कुळाच्या हक्काचे धस होतात. सातबारा उतार्यावर किंवा महसूल दप्तरात कुळाचे नाव असलेल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर वारसांना कायदेशीर प्रक्रियेद्वारे नाव लावता येत असते.
महाराष्ट्र कृषी जमीन (किमान व कमाल मर्यादा) आणि कुळ कायदा किंवा मुंबई हमी कुळ कायदा यानुसार वारसांना कुळाचे अधिकार पुढे चालवण्याचा हक्क असतो.