Akshay Baisane | अक्षय बैसाणे
ही आहे. दक्षिण कोरियाची महिला युट्यूबर ह्योजॉन्ग पार्क हिच्यासोबत अलीकडेच मुंबईत एक लज्जास्पद प्रकार घडला आहे.
मुंबईतील खार परिसरातून लाइव्ह स्ट्रीमिंग करत असताना दोन भारतीय तरुणांनी तिच्याशी छेडछाड केली. यातील एका आरोपीनं पीडित तरुणीच्या गालावर जबरदस्तीने चुंबन घेण्याचा प्रयत्न केला.
हा प्रकार लक्षात येताच अन्य दोन भारतीय तरुणांनी प्रसंगावधान दाखवत दक्षिण कोरियन महिलेच्या मदतीसाठी धाव घेतली.
त्यांनी संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आरोपींना पकडण्यासाठी मदत केली. या प्रकारानंतर ह्योजॉन्ग पार्कने तिला मदत करणाऱ्या दोन्ही तरुणांची भेट घेतली आहे.
तिघांनी एकत्र जेवण केलं आहे. याबाबतचे फोटो स्वत: पार्कने सोशल मीडियावर शेअर केले.
याप्रकरणी Hyojeong Park हिने समाधान व्यक्त केलं आहे. असे प्रकार इतर देशातही होतात, पण भारतात तत्काळ दखल घेण्यात आली, असं Hyojeong Park म्हणाली.
या एका वाईट घटनेमुळे माझा संपूर्ण प्रवास आणि इतर देशांना अप्रतिम भारत दाखवण्याची माझी आवड मी थांबवणार नाही असं Hyojeong Park म्हणाली.
मी 3 आठवड्यांहून अधिक काळ मुंबईत आहे, अधिक काळ राहण्याचा विचार करत आहे. अशी प्रतिक्रिया Hyojeong Park हिने दिली.