Sakshi Sunil Jadhav
कोकणातील पारंपारिक स्वयंपाकात ओल्या नारळाची कढी ही हलकी, पौष्टिक आणि चवीला अप्रतिम मानली जाते. उन्हाळ्यात विशेषतः ही कढी पचनासाठी फायदेशीर ठरते.
ओल्या नारळाची कढी ही कोकणात रोजच्या जेवणात आवर्जून केली जाणारी पारंपरिक रेसिपी आहे.
ओला किसलेला नारळ, ताक किंवा आंबट दूध, हिरवी मिरची, जिरे, हळद, मीठ, मोहरी, कढीपत्ता, तेल इ.
ओला नारळ, हिरवी मिरची आणि जिरे एकत्र वाटून बारीक पेस्ट तयार करुन घ्या.
भांड्यात ताक घेऊन त्यात नारळाची पेस्ट, हळद आणि मीठ घालून मध्यम आचेवर हलवत गरम केले जाते.
तेलात मोहरी, कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालून फोडणी तयार करून ती कढीवर सोडा.
कोकणी पद्धतीनुसार कढीला उकळी येऊ देत नाहीत, त्यामुळे चव आणि पोषणमूल्य टिकून राहते.
ओला नारळ शरीराला थंडावा देतो, पचन सुधारतो आणि उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करतो.
तुम्ही ही कढी भात, वरण-भात किंवा साध्या पोळीबरोबर खूपच चविष्ट लागते.