ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी कोमाकी इलेक्ट्रिक वाहन कंपनीने भारतात एक नवीन क्रूझर इलेक्ट्रिक बाईक लाँच केली आहे.
या बाईकची किंमत फक्त १.३० लाख रुपयांपासून सुरू होते. प्लस व्हेरिएंटची किंमत १.४० लाख रुपयांपर्यंत आहे. तसेच या किंमतीत तुम्हाला बाईकचे सर्व अॅक्सेसरीज देखील मिळतील.
या बाईकमध्ये ४.२ किलोवॅटची Lipo4 बॅटरी वापरली गेली आहे. प्रो व्हर्जनमध्ये, एका चार्जमध्ये बाईकची रेंज १६० ते २२० किमी पर्यंत जाते. प्रो प्लस व्हर्जनमध्ये, बाईकची रेंज १८०२४० किमी दरम्यान आहे.
दोन्ही व्हर्जनमध्ये ५ किलोवॅट हाय टॉर्क मोटर वापरण्यात आली आहे. फक्त ५ सेकंदात ही बाईक ० पासून टॉप स्पीडपर्यंत पोहोचू शकते. कंपनीच्या मते, ही बाईक शहरी राइडिंगसाठी तसेच हायवेवर ड्रायव्हिंगसाठी उत्तम आहे.
डिजिटल डॅशबोर्ड, क्रूझ कंट्रोल, रिव्हर्स मोड, ब्लूटूथ साउंड सिस्टम आणि मोबाईल चार्जिंगची सुविधा आहे.
राईड कम्फर्टसाठी दोन्ही मॉडेल्समध्ये टेलिस्कोपिक सस्पेंशन, ड्युअल डिस्क ब्रेक, बॅकरेस्टसह आरामदायी सीट्स आणि मागील टेल लॅम्प गार्ड आहेत.
दैनंदिन गरजा लक्षात घेऊन, कंपनीने ५० लिटर स्टोरेज कंपार्टमेंट, पार्क असिस्ट, ऑटो रिपेअर स्विच, टर्बो मोड आणि मागील बाजूस प्रोटेक्शन देखील दिले आहे.