कोल्हापुरी स्टाईल तांबडा आणि पांढरा रस्सा घरी कसा बनवायचा? सोपी रेसिपी

Manasvi Choudhary

तांबडा आणि पांढरा रस्सा

कोल्हापुरी स्टाईल तांबडा आणि पांढरा रस्सा प्रसिद्ध आहे.

थाळी

हॉटेल असो या धाबा जेवणाच्या थाळीमध्ये तांबडा आणि पांढरा रस्सा वेगळीच मज्जा येते.

सोपी रेसिपी

तांबडा आणि पांढरा रस्सा घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

साहित्य

तांबडा आणि पांढरा रस्सा बनवण्यासाठी चिकन किंवा मटण, कांदा, हळद, सुके खोबरं, लसूण, आलं, धने, जीरे हे साहित्य घ्या.

चिकन किंवा मटण स्वच्छ धुवा

सर्वप्रथम चिकन किंवा मटण स्वच्छ धुवून हळद आणि मीठ चोळून अर्धा तास बाजूला ठेवा.

आलं लसूण पेस्ट तयार करा

गॅसवर कुकरमध्ये गरम तेलामध्ये कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्या नंतर यामध्ये आलं लसूण पेस्ट घाला.

शिजवून घ्या

नंतर या मिश्रणात स्वच्छ धुतलेले मटण किंवा चिकन घालून मीठ आणि थोडे पाणी घालून शिजवून घ्या.

पेस्ट करा

मिक्सला सुकं खोबर,कांदा,लसूण, आलं आणी खडे मसाले, तीळ,खसखस व्यवस्थित भाजून घ्या थोडं पाणी घालून मिक्सर मधून पेस्ट करा.

मसाला लावा

आता एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यात मिरची पेस्ट, आलं लसूण पेस्ट आणि बारिक चिरलेला कांदा घालून सोनेरी रंगावर परतून घ्या,नंतर त्यात काश्मीरी मिरची पूड, धने जीरे पूड,कांदा लसूण मसाला घालून परतून घ्या

नारळाचे दूध

पांढरा रस्सा बनवण्यासाठी तुम्ही यात काजूची पेस्ट घालून परतून घ्यानंतर नारळाचे दूध घालून शिजवून घ्या

coconut | yandex

मिठ घाला

आता मॅरीनेट केलेलं चिकन यात घालून परतावे, आणि मग तयार वाटण पेस्ट घालून चांगले तेल सुटे पर्यंत परतून घ्या गरम पाणी समप्रमाणात घालून मिठ घाला.

तांबडा आणि पांढरा रस्सा

अशाप्रकारे कोल्हापुरी स्टाईल तांबडा आणि पांढरा रस्सा तयार आहे.