Shreya Maskar
कोबीची वडी बनवण्यासाठी कोबी, हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर, तीळ, ओवा, बेसन, हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ इत्यादी लागते.
तांदळाचे पीठ आणि ज्वारीचे पीठ तुम्ही कोबीची वडी बनवण्यासाठी वापरा.
कोबीची वडी बनवण्यासाठी कोबी बारीक चिरून घ्या.
चिरलेल्या कोबीमध्ये हिरवी मिरची, आलं लसणाची पेस्ट घाला.
तयार झालेल्या पेस्टमध्ये कोथिंबीर, पांढरे तीळ, ओवा, ज्वारीचे पीठ, बेसन आणि तांदळाचे पीठ घालून छान मिक्स करा.
आता या मिश्रणात चिमूटभर हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून सर्व एकजीव करा.
सर्व मिश्रणाची कणीक मळून घ्या आणि पीठाचे लांब गोळे तयार करून इडली पात्रात चांगले वाफवून घ्या.
वाफवलेली वडी थंड झाल्यानंतर कापून तेलात खरपूस तळून घ्या.